अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांची जोडी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. २०१८ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. तर आता खुशबूने त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली आहे.

खुशबू सध्या तिच्या ‘सारे काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत. ही मालिका म्हणजे दोन बहिणींची गोष्ट आहे. गेली अनेक दिवस या मालिकेची टीम या मालिकेचं खूप प्रमोशन करत होते. नुकतीच त्या सर्वांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. त्यावेळी खुशबूने तिचे आणि संग्रामचे सूर कसे जुळले हे सांगितलं.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू

आणखी वाचा : ‘अशी’ सुरु झाली मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी, म्हणाले, “घरी सांगितलं तेव्हा…”

ती म्हणाली, “आमचा शूटिंग सेटवरचं जमलं. संग्रामची एक मालिका सुरू होती. तिथे आमची भेट झाली. पण खरी आमची लव्हस्टोरी सुरू झाली ती मी त्या मालिकेतून एग्झिट घेतल्यानंतर. आपण एकत्र असतो तेव्हा आपल्याला एकमेकांची तितकी किंमत कळत नाही पण लांब गेल्यावर कळते. मग तेव्हा आम्ही एकमेकांचे नंबर शोधण्यापासून सगळं केलं.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’मधील एंट्रीआधीच आशुतोषची बहीण चर्चेत, अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नेटकरी म्हणाले…

खुशबूच्या या उत्तरावर आदेश बांदेकर यांनी तिला विचारलं, “हे सगळे कष्ट कोणी घेतले?” त्यावर खुशबू म्हणाली, “आम्ही दोघांनीही कष्ट घेतले नाहीत. ते सगळं आपोआप होत गेलं. आतापर्यंत आमच्यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोजही केलेलं नाही. त्या सगळ्या कळण्यासारख्याच गोष्टी होत्या.” तर आता खुशबूच्या या उत्तरावर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader