‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची कथा, संवाद, सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. तर सोशल मीडियावर सक्रिय राहून मालिकेतील कलाकार एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. तर आता ऑनस्क्रीन लेकाच्या वाढदिवसानिमित्त मधुराणी प्रभुलकरने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता निरंजन कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये निरंजन अरुंधती आणि आशुतोषच्या मोठ्या मुलाची म्हणजेच ‘अभि’ची भूमिका साकारत आहे. पहिल्या दिवसापासून या मालिकेत असल्याने आणि मधुराणी आणि त्याचे अनेक सीन्स एकत्र असल्याने त्याचं आणि मधुराणीचं खास बॉण्डिंग तयार झालं आहे.

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

आणखी वाचा : “माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

आज निरंजनच्या वाढदिवसानिमित्त मधुराणीने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. मधुराणीने तिचा आणि निरंजनचा एक बिहाइंड द सीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “हॅपी बर्थडे निरू… तुला माहित आहे, तू माझा फेव्हरेट आहेस.”

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

आता मधुराणीची ही स्टोरी खूप चर्चेत आली आहे. तरी आज बरोबर सोशल मीडियावरून नेटकरी निरंजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader