बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-बाबा होणार आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी कपूर कुटुंबीय जय्यत तयारी करत आहेत. रणबीरची आई व प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूरही आजी होणार असल्यामुळे उत्सुक आहेत. नुकतंच त्यांनी कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ शोमध्ये हजेरी लावली.
‘झलक दिखला जा’ या शोचा दहावा सीझन सध्या सुरू आहे. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि दिग्दर्शक करण जोहर याचे परिक्षण करत आहेत. नीतू कपूर यांनी हजेरी लावलेल्या भागात स्पर्धकांनी खास डान्स सादर केले. हा भाग कपूर स्पेशल म्हणून सेलिब्रेट करण्यात आला. आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्यातील खास क्षणांचे दृश्यही डान्सद्वारे दाखवण्यात आले.
हेही वाचा >> ‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…”
हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
रणबीर-आलिया आई-बाबा होणार असल्यामुळे माधुरी दीक्षितने त्यांना खास गिफ्टही दिलं. माधुरीने बाळ गोपाळ कृष्णाची मुर्ती भेट म्हणून रणबीर-आलियाला दिली. नीतू कपूर यांना ती म्हणाली, “रणबीर-आलियाचं लग्न झालं. आता ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांच्यासाठी माझ्याकडून ही खास भेटवस्तू”. यावर नीतू कपूर यांनी माधुरी दीक्षितचे आभार मानून तिला मिठी मारली.
हेही वाचा >> प्रवीण तरडेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाले “कुठल्याही मेसेजवर…”
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी एप्रिल २०२२मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. नुकताच आलियाच्या डोहाळे जेवणाचा शाही कार्यक्रमही पार पडला. कपूर कुटुंबियांप्रमाणेच चाहतेही त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.