प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती सहभागी झाली होती. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. ती सोशल मीडियावर कायमच विविध पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेघा घाडगे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायम विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

मेघा घाडगेची फेसबुक पोस्ट

“मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा सर्वस्वी अधिकार आणि सामाजिक भान मला आहे आणि बहुतेक हे सर्वांनांच असत. नाही का ?? जिथे बोलायला आणि comment करायला हवी तिथे मात्र तोंड आणि बुद्धी जाणूनं बुजून बंद ठेवता तेव्हा तुमचे संस्कार पाणी त्यायला जातात.

मी माझी रंगमंचावरील जबादारी कोणतही राजकारण न करता चोख पार पाडते. तिथे मला बंधन आहेत . पण माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायला आणि बोलायला कोणालाही मी अधिकार दिलेले नाहीत . तर कृपया जगा आणि जगुद्यात”, असे मेघा घाडगेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

मेघाने या पोस्टबरोबरच काही फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत. यातील एक फोटो हा कार्यक्रमापूर्वीचा आहे. तर दुसरा फोटो हा लावणीच्या कार्यक्रमातील आहे. तर व्हिडीओत मेघा ही एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना दिसत आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress megha ghadge facebook post after get troll due to cloths nrp