अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध माध्यमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या संपर्कात असतात. तर आता त्यांनी त्यांचा लेक आणि सूनेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराज कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे गेली अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीत काम करत आहेत. तर त्या दोघांनाही प्रेक्षकांचा नेहमीच खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. दोघे जण यशाच्या पायऱ्या चढत आहेत. तर आता त्यानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्या दोघांचं कौतुक केलं आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शिवानी काम करत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही एकमेकांना सपोर्ट करत उत्तम प्रगती करत आहात याचा खूप आनंद आहे. शिवानीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि आज तुझी नाट्यसंस्था Theatron बारा वर्षाची होणार ! तुमच्या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद आहे हे किती मस्त ! सहाही नाटक धमाल उडवून देतात. दोघेही अशीच मेहनत करा. खूप खूप यश मिळवा. ‘टीम तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘टीम Theatron’ खूप खूप शुभेच्छा !!”
तर आता त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते शिवानी आणि विराजसच्या कामाचं कौतुक करत आहेत.