‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री नारायणी शास्त्री ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ४५ वर्षीय नारायणीने आजवर अनेक मालिका व काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नारायणी तिच्याहून लहान वयाच्या अभिनेत्री गौरव चोप्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. गौरवबरोबर ब्रेकअप झाल्यावर तिने स्टिव्हन ग्रेव्हर नावाच्या विदेशी व्यक्तीशी लग्न केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायणीने एका मुलाखतीत सांगितलं की तिची सर्व एक्स बॉयफ्रेंड्सशी खूप चांगली मैत्री आहे. इतकंच नाही तर ते सगळे तिच्या पतीचेही चांगले मित्र आहेत. तिच्या पतीने एकदा तिच्या वाढदिवसासाठी सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना बोलावलं होतं, असा किस्सा तिने सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

“एक माणूस समोरून आला अन्…”, दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडला होता धक्कादायक प्रसंग

“तो माझा खूप आदर करतो. माझ्यासाठी माझे मित्र किती महत्त्वाचे आहेत, हे त्याला माहित आहे. त्याची माझ्या मित्रांशी व माझ्या एक्स बॉयफ्रेंडशीही मैत्री आहे. त्याला कधीच माझ्या व गौरवच्या मैत्रीबद्दल असुरक्षित नसतो. माझ्या एका वाढदिवसाला त्याने माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना बोलावलं होतं. माझ्यासाठी त्याने सरप्राइज ठेवलं होतं. त्याचं मन खूप मोठं आहे,” असं नारायणीने सांगितलं.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

नारायणी व गौरव दोघेही रिलेशनशिपमध्ये होते, पण काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही आपण एकमेकांच्या संपर्कात असल्याचं नारायणीने म्हटलं आहे. “माझं आणि गौरवचं ब्रेकअप झालं तरी आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही कधीच एकमेकांशी बोलणं बंद केलं नाही. या काळातही आम्ही एकमेकांना साथ दिली. कारण आम्ही एकमेकांच्या आयुष्यात होतो, फक्त नातं बदललं होतं. आम्ही आजही एकमेकांना भेटतो, बोलतो,” असं नारायणी म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress narayani shastri husband once invited her all ex boyfriends for party hrc