Nausheen Ali Sardar Brother Death: टीव्ही अभिनेत्री नौशीन अली सरदारबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या मोठ्या भावाचं निधन झालं, पण सेटवरील नो मोबाईल पॉलिसीमुळे तिला वेळेत कळू शकलं नाही आणि ती वेळेवर घरी पोहोचू शकली नाही. ‘वसुधा’ मालिकेच्या सेटवर फोन वापरण्याची परवागनी नसल्याने हे घडलं.

नौशीन अली सरदार ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘वसुधा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. १६ सप्टेंबर रोजी नौशीनच्या मोठ्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती आपल्या भावाच्या शेवटच्या क्षणी वेळेवर पोहोचू शकली नाही. सेटवरील कडक नियमांमुळे तिला या घटनेबद्दल खूप उशीरा कळालं आणि या कठीण काळात ती घरी वेळेवर जाऊ शकली नाही.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत

नौशीनच्या काही जवळच्या लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. सेटवरील ‘नो फोन पॉलिसी’मुळे नौशीनला तिच्या भावाच्या मृत्यूची माहिती दोन तासांनंतर मिळाली. भावाबद्दल कळताच तिला धक्का बसला आणि ती लगेच घरी निघून गेली. अभिनेत्री अजूनही तिच्या भावाच्या निधनाच्या दुःखातून सावरलेली नाही. या कठीण काळात ती आपली आई आणि वहिनीची काळजी घेत आहे.

हेही वाचा –“मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD

“नौशीनला जेव्हा तिच्या भावाच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्का बसला. ती लगेच घरी गेली. ती तिच्या भावंडांच्या खूप जवळ आहे आणि या धक्क्यातून सावरायला तिला वेळ लागेल. ती सध्या तिच्या आई आणि वहिनीची काळजी घेत आहे,” अशी माहिती एका सूत्राने ई-टाइम्सला दिली.

हेही वाचा – अरबाज पटेलच्या मनात निक्कीसाठी भावना, त्याच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “आता स्वतःची…”

४२ वर्षांची नौशीन अली सरदार ‘कुसूम’, ‘बरसातें मौसम प्यार का’, ‘दो दिलों के खेल में’, ‘अलादीन’, ‘बिंद बनाऊंगी’ अशा मालिकांसाठी ओळखली जाते.