Navina Bole separated from Husband: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री नवीना बोले हिचा सात वर्षांचा संसार मोडला आहे. नवीना पतीपासून विभक्त झाली आहे. तिने स्वतःच याबद्दल माहिती दिली आहे. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहोत, असंही नवीनाने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री नवीना बोले हिने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. तिचा पती जीत करन हा आर्थिक सल्लागार आहे. लग्नानंतर सात वर्षांनी या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनाला ई-टाइम्सने पतीपासून विभक्त होण्याच्या वृत्तांबद्दल विचारलं असता तिने हे खरं असल्याचं म्हटलं आहे.

“जीत आणि मी तीन महिन्यांपूर्वी वेगळे झालो आहोत आणि आम्ही लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरू करू. आम्ही आमच्या पाच वर्षांची मुलगी किमायराचे सह-पालक आहोत. जीत आठवड्यातून दोन दिवस तिच्याबरोबर घालवतो. आम्ही सहमतीने वेगळे झाले आहोत. एकत्र दुःखी राहण्यापेक्षा वेगळं होणं आणि आनंदी आयुष्य जगणं चांगलं आहे,” असं नवीना म्हणाली.

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

लग्न टिकवायचा प्रयत्न केला पण…

वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल पुढे नवीना म्हणाली, “जीत आणि माझ्या लग्नात सुरुवातीला सगळं चांगलं होतं, पण हळूहळू गोष्टी बदलल्या. आम्ही आमच्या मुलीसाठी हे लग्न टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्यात यश आलं नाही. लग्नात संवाद आणि एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं महत्वाचे आहे,” असंही तिने नमूद केलं.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

“ही आमची कौटुंबिक बाब आहे आणि आमच्यात मतभेद आहेत. त्यामुळे मी या प्रकरणात आमची प्रायव्हसी जपण्याची विनंती करतो,” अशी प्रतिक्रिया जीत करनने दिली.

अभिनेत्री नवीना बोले (फोटो – इन्स्टाग्राम)

नवीना ही बऱ्याच वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती शेवटची ‘तेरे इश्क में घायल’ या शोमध्ये दिसली होती. तिने ‘इश्कबाज’ या लोकप्रिय मालिकेत नकारात्मक भूमिका केली होती. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

“मी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे पण गेल्या काही वर्षांत मी मालिका करत नाही, कारण माझ्या मुलीला वेळ देणं गरजेचं आहे, मग मी वेब शोमध्ये काम करायचं ठरवलं. टीव्ही मालिकांपेक्षा वेब शोच्या शूटिंगला कमी वेळ द्यावा लागतो,” असं नवीना यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती. नवीना सध्या वेब शोमध्ये काम करत आहे. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘सुमित संभाल लेगा’, ‘बडी दूर से आये है’, ‘यम है हम’, ‘ये है मोहब्बतें’ आणि ‘बाल वीर’ यांसारख्या शोमध्येही काम केले आहं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress navina bole separated from husband jeet karran hrc