मनोरंजन क्षेत्रातील कलाकार कोणी लग्नगाठ बांधत आहेत तर कोणी आई बाबा बनत आहेत. मागच्या वर्षी बॉलिवूडमधील लाडकी जोडी आलिया भट्ट रणबीर कपूरने लग्न केले, नुकताच त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. बॉलिवूडप्रमाणेच आता टीव्ही जगतातून एक आनंदाची बातमी आली आहे ‘डोली अरमानो की’ फेम अभिनेत्री नेहा मर्दा लग्न झाल्यानंतर १० वर्षानंतर आई होणार आहे. यामुळे तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत.
नेहा मर्दाने २०१२ साली पाटणा व्यावसायीक आयुष्मान अग्रवाल याच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिला मूल न झाल्यामुळे तिला खूप सहन करावे लागले होते. इटाईम्सला मुलाखत देताना तिने आपली खंत व्यक्त केली होती. “जेव्हा मला माझ्या प्रेग्नेंसीबद्दल कळले, तेव्हा मी खूप उत्साहित होते. मला जसं लग्न करायचं होतं तसंच मला आई व्हायचं होतं हे मी नेहमी सांगितलं होतं. लग्न झाल्यावर १० वर्षानंतर पहिल्या मुलाची अपेक्षा करताना मला खूप आनंद होत आहे.”
नेहा मर्दाने सांगितले की नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक तिला गरोदर नसल्याबद्दल तिला जज करायचे. ती पुढे म्हणाली, “असं नाही की आम्ही १० वर्षांपासून प्रयत्न करत होतो, परंतु मला ‘लग्नानंतर मला मुलं नकोत, मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आहे असे लोकांनी मला टोमणे मारले. आपल्याला माहित असतं दूरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, तुमचे कुटुंब असा विचार करत नाही, कारण ते तुम्हाला ओळखतात. आजूबाजूचे लोक हस्तक्षेप करतात. मी त्यांची कधीच पर्वा केली नाही आणि जे काही होईल ते बघितले जाईल या विचाराने त्यांच्याकडे पाहून हसले.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
नेहाने ‘साथ निभाना साथिया या टीव्ही कार्यक्रमातून २००५ साली पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘घर एक सपना’ (२००५), ‘ममता’ (२००६), ‘बालिका वधू’ (२००८), ‘जो इश्क का मरझी वो रब की मर्जी’ (२००९), ‘देव के देव: महादेव’ या मालिकांमध्ये झळकली आहे