कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याचदा सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री नेहा मर्दा. ‘बालिका वधु’ या हिंदी मालिकेमुळे नेहा नावारुपाला आली. कामामुळे सतत चर्चेत असणारी नेहा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नाच्या ११ वर्षानंतर नेहा पहिल्यांदाच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने ही गुड न्यूज दिली.

नेहाबाबत आता एक वेगळी माहिती समोर आली आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. ‘पिंकवीला’च्या वृत्तानुसार, गरोदरपणात तिला काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्यातरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहाला ठेवण्यात आलं आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ नेहा रुग्णालयामध्ये असेल.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”

आणखी वाचा – “आता माझे वडील नाहीत पण…” आकाश ठोसरने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या आईने…”

नेहाच्या टीमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे रुग्णालयामधील फोटो शेअर केला आहे. तसेच तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा असं नेहाच्या टीमने सांगितलं आहे. दोन महिन्यांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही थाटामाटात पार पडला. सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर करत तिने डोहाळे जेवणाचीही माहिती दिली होती. डोहाळे जेवणासाठी तिने लेवेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

आणखी वाचा – चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; दत्तू मोरे मालिकांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून करायचा काम, म्हणाला, “एक काळ…”

२०१२मध्ये नेहा व आयुष्मान अग्रवालचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. नेहा व आयुष्यमान त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले. नेहाने २००५मध्ये तिच्या अभिनयक्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आतापर्यंत तिने ‘देवों के देव महादेव’, ‘डोली अरमानों की’, ‘पिया अलबेला’,’ लाल इश्क’ ‘क्यूं रिश्तों में कट्टी-बट्टी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader