ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मालिका चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून निवेदिता यांनी प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये निवेदिता यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेत्रीबरोबर निविदेता एक उत्तम शेफही आहेत. निरनिराळ्या पद्धतीचे जेवण बनवायला त्यांना नेहमीच आवडतं. सोशल मीडियावर त्या नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवलेले व्हिडीओ पोस्ट करत असतात. आता भाऊबीजेनिमित्त त्यांनी खास बेत बनवला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी या पदार्थांची झलकही दाखवली आहे.
हेही वाचा- KBC 15: “मी खरकटी भांडी घासली, अन्…” ‘केबीसी १५’च्या मंचावर बिग बी यांचा मोठा खुलासा
भाऊबीजेनिमित्त निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी तयार केलेला खास बेत बघायला मिळत आहे. भाऊबीजेनिमित्त निवेदिता सराफ यांनी स्वत:च्या हाताने घरीच स्वयंपाक बनवला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निवेदिता म्हणत आहेत की, ”आजचा भाऊबीजेचा बेत आहे शेव बटाटा पुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटिस, पाणी पुरी आणि त्याचबरोबर मस्तपैकी हैद्राबादी दम चिकन बिर्याणी आणि थोडीशी व्हेजिटेबल बिर्याणी”, या खायला असं म्हणत त्यांनी चाहत्यांना आमंत्रणही दिलं आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी बनवलेले रुचकर पदार्थ पाहायला मिळत आहेत.
निवेदिता सराफ यांना स्वयंपाकाची आवड आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या या आवडीबाबत खुलासाही केला आहे. “निवेदिता सराफ रेसिपीला सगळेच हो म्हणतात. माझ्या घरी मी बनवलेले पदार्थ चाखून जातात, त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा, असं मला वाटतं”, असं त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा- “हा गंभीर विराटची सासू असल्यासारखा…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा गौतम गंभीरला टोला
निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. निवेदिता सराफ यांनी ‘अखेरचा सवाल’, ‘कॉटेज नं ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘वाडा चिरेबंदी’ नाटकांमधल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. सध्या त्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या नाटकात झळकताना दिसत आहेत. तसेच त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत.