अभिनेत्री निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्ष त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. गेली अनेक दशकं त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची आणि अशोक सराफ यांची जोडीही सुपरहिट आहे. या जोडीचे लाखो चाहते आहेत. तर त्या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांना लग्नानंतर पहिली भेट कोणती दिली होती हे निवेदिता सराफ यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवेदिता सराफ सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आणि अशोक मामांबद्दलच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतात. याचबरोबर अनेक मुलाखतींमधूनही त्या त्यांच्या नात्याबद्दल भरभरून व्यक्त होत असतात. आता त्यांनी लग्नानंतर अशोक मामांनी त्यांना दिलेल्या पहिल्या भेटीची आठवण शेअर केली आहे.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “लग्नाच्या आधी त्यांनी मला निवेदिता असं लिहिलेलं सोन्याचं ब्रेसलेट दिलं होतं. याचबरोबर एक घड्याळही दिलं होतं. लग्नानंतरही त्यांनी मला भरपूर भेटवस्तू दिले आहेत. एकदा त्यांनी मला सोन्याचा नेकलेस भेट दिला होता.”

हेही वाचा : अशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”

आता निवेदिता सराफ यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांचे चाहते त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्यामधील बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress nivedita saraf revealed which was the first gift ashok saraf gave her after their marriage rnv