निवेदिता सराफ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानल्या जातात. कलक्षेत्रात त्यांच मोठं योगदान आहे. चित्रपट, मालिकांबरोबर त्यांनी नाटकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा- “…म्हणून मी प्रसादला लग्नासाठी होकार दिला”; अमृता देशमुखने सांगितलं मोठं कारण, म्हणाली….
नुकतंच निवेदिता यांनी सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात हजेर लावली. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रात नाटकाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक नाटयगृहांना भेटी दिल्या आहेत. दरम्यान या मुलाखती त्यांनी नाट्यगृहांच्या अवस्थेवर भाष्य करत संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’मधील ‘ही’ अभिनेत्री झळकणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत
निवेदिता म्हणााल्या. “नाट्यगृहांच्या परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. दुर्देवाने नाटयगृहांची अवस्था जशी होती तशीच आहे.तेव्हाची नाट्यगृहांमध्ये कचऱ्याचे डबे नसायचे. आताही नसतात. नाट्यगृहांमध्ये महिलांच्या खोलीत आतमध्ये बाथरुम नाहीये. कित्येक स्त्रिया काम करतात. त्यांचे काही मासिक पाळीचे त्रास असतात. मासिक पाळीदरम्यान महिलांनी करायचं काय? पण कशाचाही कुठलाही विचार केला गेला नाही. व्हिलचेअवरील व्यक्तीला नाटक बघायचं असेल तर किती नाटयगृहांमध्ये अशी सोय आहे? वाडा चिरेबंदी नाटक करताना आम्हाला माईकशिवाय नाटक करावं लागलं. कारण या नाटकात दहा व्यक्तिरेखा आहेत. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या विंगेमध्ये तुमचा आवाजच पोहचत नाही.”
निवेदिता पुढे म्हणाल्या. “बऱ्याचदा शासकीय कार्यक्रमांना नाट्यगृह दिली जातात. ते शासकीय कार्यक्रम लांबतच जातात. पुण्यातील बालगंधर्वसारख्या नाटयगृहातील नाटकांना लांबून माणसं आलेली असतात. त्यात वयोवृद्ध माणसंही असतात. अगोदरचा कार्यक्रम संपेपर्यंत दरवाजा उघडला जात नाही. बाहेर बसायला जागा नाहीये. कुठे बसणार ती माणसं? बाथरुमला कुठे जाणार? अनेकदा आम्हीही बाहेर ताटकळत उभे असतो. आम्हाला मेकअप रुम मिळत नाहीत. एखाद्या वेळेत सुरु झालेला कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच संपवण्याची सवय आपल्याला अजूनही लागलेली नाही. सगळी नाट्यगृह प्रायवेट ट्रस्टला देण्याची खूप गरज आहे.”
हेही वाचा- अदिती आणि राहुल द्रविड यांची ग्रेट भेट! दोघांमध्ये असलेलं नातं ठाऊक आहे का?
निवेदिता यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच त्यांचे ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.