छोट्या पडद्यावर विविध मालिका कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. या मालिकांमुळे अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले आहेत. रुंजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून पल्लवी पाटीलला ओळखले जाते. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. नुकतंच पल्लवीने तिच्या घटस्फोटामागील खरं कारण सांगितले आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटीलने अभिनेता संग्राम समेळबरोबर लग्नगाठ बांधली. २०१६ मध्ये त्या दोघांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण त्या दोघांचेही नातं फार काळ टिकलं नाही. त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नुकतंच प्लॅनेट मराठीवरील एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

“जेव्हा माझा घटस्फोट झाला, त्यानंतर मग अचानकच आपल्यात लख्ख प्रकाश पडतो, तसंच काहीस माझ्याबाबतीत झालं. त्यावेळी आपल्याला जाणवतं की आपण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात राहू शकत नाही. याचं मला अजिबात दु:ख वैगरे वाटत नाही. मला पश्चात्तापही होत नाही.

कारण माझं बालपण हे एका वेगळ्या कुटुंबात झालं आहे. तिथे मी माझ्या घराची प्रमुख होते. मी माझ्या आई-वडिलांना सांभाळात होते. अचानक एका वेगळ्या घरात गेल्यानंतर मला ते वातावरण अवघड गेलं. मला तिथे जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. मी प्रयत्न केला. पण काही काळाने मी सर्व गोष्टींचा त्याग केला. मला ते जमणार नाही, असं मला वाटलं.

मला त्या सर्व गोष्टींचा सामना का करायचा, असा मी विचार केला. त्यामुळेच मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा आई-बाबांबरोबर राहायला लागले. त्यावेळी मला समजलं की मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. मला तिकडे अनेक गोष्टी चुकल्या चुकल्यासारख्या वाटत होत्या. पण त्या घरी आल्यानंतर मला मिळाल्या”, असे पल्लवीने म्हटले.

आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”

दरम्यान पल्लवी पाटील ही रुंजी या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय आहे. पल्लवी पाटीलनं ‘बापमाणूस’, ‘रुंजी’, ‘अग्निहोत्र 2’ अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘वैदही’ या मालिकेतही झळकली होती.

Story img Loader