लोकप्रिय तेलुगू व कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे रविवारी कार अपघातात निधन झाले. पवित्राच्या कारला बसने धडक दिली. हैदराबादमध्ये मृत्यू झाला. ती तिची बहीण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांतसह कारने प्रवास करत होती. ‘त्रिनयनी’ या शोसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादमधील मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला. पवित्रा कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील हणाकेरे इथं परतत असताना हा भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर एका बसने या कारला धडक दिली. या भीषण अपघातात पवित्राचा जागीच मृत्यू झाला तर तिच्याबरोबर असलेले इतर सर्वजण गंभीर जखमी आहेत. त्या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

पवित्रा जयराम ‘तिलोत्तमा’ या टीव्ही मालिकेमुळे खूप लोकप्रिय झाली होती. तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिच्या अचानक अपघाती जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या हुरहुन्नरी अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड इंडस्ट्रीतील कलाकारही शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”

पवित्रा यांच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनाबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते समीप आचार्यने अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress pavitra jayaram died in car accident hyderabad hrc