‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगसुद्धा मोठं आहे. तर आता तिच्या नवीन घराचा इनसाईड व्हिडीओ समोर आला आहे.
प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्या फोटोंमध्ये तिच्या घराची छोटीशी झलक दिसली. त्यामुळे तिचं घर नक्की कसं आहे, याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती. आता हे घर कसं आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या भावाने हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या सुरुवातीला प्राजक्ता तिच्या घराचा आकर्षक डिझाईन केलेला लाकडी दरवाजा उघडताना दिसत आहे. दरवाज्याच्या समोरच्या भिंतीवरच प्राजक्ताचा एक सुंदर फोटो लावण्यात आला असून त्यावर प्राजक्ताताई गायकवाड असं लिहिलं आहे. त्यानंतर तिच्या घराचा प्रशस्त हॉल आणि टीव्हीच्या बाजूला ठेवलेली तिला मिळालेली पारितोषिकं दिसत आहेत. या हॉलला पांढरा रंग देण्यात आला आहे. तर वरच्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी हॉलमधून एक जिना आहे. तर जिन्याच्या भिंतीवर तिचे फोटो आणि पेंटिंग्स लावण्यात आली आहेत. तर आणखी एका भिंतीवर तिला मिळालेली प्रशस्तीपत्रकं फ्रेम करून लावण्यात आली आहेत.
हेही वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
प्राजक्ताच्या या आलिशान घराचा व्हिडीओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. यावर कमेंट करत तिचं चाहते तिचं हे घर खूप आवडल्याचं सांगत आहेत.