मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर गेली काही वर्षं ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तर आता पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष तिच्याकडे घेतलं आहे आणि याचं खास कारण म्हणजे तिचं नवीन घर.

प्राजक्ता माळी तिच्या करिअरबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. तर आता नुकतंच तिने तिचं नवीन ड्रीम होम खरेदी केलं आहे. तिचं हे नवीन घर मुंबईत नाही तर एका खास शहरात आहे.

Swanandi Tikekar new home
स्वानंदी टिकेकरने घेतलं नवीन घर! पतीसह फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, दाखवली नव्या घराची झलक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
new luxurious administrative building of thane municipal corporation will be constructed on site of Raymond Company residents oppesed
निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधींची घरे घेतली पण, तेच नष्ट होतेय
Applicants disapproval due to prices for CIDCO preferred houses navi Mumbai news
२६ हजार घरे, १५ हजार अर्जदार; ‘सिडको’च्या पसंतीच्या घरांसाठी दरांमुळे नापसंती
Subhash Ghai
प्रसिद्ध दिग्दर्शकाने विकलं मुंबईतील घर; ८.७२ कोटीला घेतलेलं, आता मिळाले ‘इतके’ कोटी
Pune , House , Building , Redevelopment ,
लोकजागर : घर म्हणजे फक्त इमारत असते का?
MIDC plots, MHADA, Agreement ,
एमआयडीसीचे भूखंड म्हाडाकडून विकसित ? संयुक्त भागीदारी तत्त्वाबाबत लवकरच करार
New guidelines, Maharera , home buyers, home ,
घर खरेदीदारांसाठी महारेराकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी

आणखी वाचा : प्रशस्त खोल्या, आकर्षक फर्निचर अन्..; ‘असं’ आहे प्राजक्ता गायकवाडचं नवीन आलिशान घर, पाहा Inside Photos

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, प्राजक्ताने पुण्यात तिचं स्वतःचं घर घेतलं आहे. नुकताच एका यूट्यूब व्हिडीओमध्ये तिने याचा खुलासा केला. पुण्यातील एका छान भागात एका इमारतीमध्ये १७ व्या मजल्यावर प्राजक्ताने हे घर बुक केलं आहे. याचबरोबर तिने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. तिने ज्या इमारतीमध्ये घर बुक केलं आहे त्या इमारतीचं बांधकाम अजून सुरू आहे. प्राजक्ताला या इमारतीचा परिसर खूप आवडला आहे.

हेही वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…

या नवीन घरासाठी तिने खास नेमप्लेटही बनवून घेतली आहे. त्याची झलक तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वरून दाखवली होती. त्यामुळे प्राजक्ताच्या या नवीन घराबद्दल चाहत्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे. या इमारतीचं सगळं बांधकाम झाल्यावर दोन वर्षांनी प्राजक्ताला या घराचा ताबा मिळेल.

Story img Loader