मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
प्राजक्ता ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय आहे. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोत ती कुटुंबाबरोबर निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं ‘निसर्ग तुम्हाला प्रफुल्लित करतो, पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद घेणे यापेक्षा चांगली थेरपी दुसरी कुठलीच नाही.’ फोटोमध्ये प्राजक्ता पाण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. कुटंबाबरोबरचे आनंदाचे घालवलेले क्षण प्राक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ताने नुकतच खरेदी केलेल्या तिच्या कर्जतच्या फार्महाऊसच जवळचे हे फोटो आहेत.
प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं “निसर्ग सानिध्य शांती सुखद अनुभव प्युअर शुद्ध हवा वातावरण एकुणच हेल्दी आल्हाददायक वातावरण महत्वपूर्ण व्यक्तीमत्वासाठी मस्तच लय भारी लयच भारी नादखुळा”. तर आणखी एकाने तिला ‘जलपरी’ ची उपमा दिली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये फार्म हाऊस खरेदी केले होते. प्राजक्ताने सोशल मीडियावर या फार्म हाऊसचे फोटोही शेअऱ केले होते. प्राजक्ताचे हे फार्म हाऊस डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. फार्महाऊसच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. या फार्महाऊसला तिने ‘प्राजक्तकुंज’ असं नाव दिलं आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. प्राजक्ता या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे. नुकतंच प्राजक्ताने शुटींगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम १४ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.