मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनेत्रीबरोबरच ती एक व्यावसायिकाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमठवणाऱ्या प्राजक्ताने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
‘सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ’चा ‘युवा पुरस्कार’ने प्राजक्ताला सन्मान करण्यात आला आहे. प्राजक्ताने हा पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. हा व्हिडीओ पाहून प्राजक्ताचं चाहते अभिनंदन करत आहेत. तसेच तिने यावेळी साडी परिधान केल्यामुळे तिचं विशेष कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ
पुरस्कार स्वीकारताना प्राजक्ता अगदी भारावून गेली होती. व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचा युवा पुरस्कार मिळाला. पुणे शहरात वाढले, सगळं शिक्षण पुण्यात झालं, पुणे विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे.”
आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?
“यामध्ये ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, माझे नृत्य गुरूद्वय- गुरू श्रीमती स्वातीताई दातार, गुरू श्री. परिमल फडके, माझं कुटूंब, माझी प्राथमिक शाळा – समर्थ विद्यालय, माध्यमिक शाळा, दामले प्रशाला-महाराष्ट्र मंडळ पुणे शहर, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, आतापर्यंत केलेल्या सगळ्या मालिका, चित्रपट, विशेषकरून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, आर्ट ऑफ लिव्हींग फाऊंडेशन-श्री श्री रवीशंकरजी आणि माझा अत्यंत प्रामाणिक असा प्रेक्षकवर्ग या सगळ्यांचा सहभाग आहे.” शिवाय यापुढे प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करणार असल्याचं प्राजक्ताने सांगितलं.