अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली. सध्या अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात निवेदिका म्हणून काम करत आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी नुकताच तिचा वाढदिवस कर्जत येथील फार्महाऊसवर साजरा केला होता. यानंतर आता या सगळ्या कलाकारांनी प्राजक्ताला तिच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे.

हेही वाचा : Video : “आई, थकत कशी नाहीस गं तू?”, सोनाली कुलकर्णीने सारेगमपच्या मंचावर आईसाठी सादर केली खास कविता

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Actor Pankaj Tripathi statement about theatre Mumbai news
रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन
prajakta mali new poem marathi
Video : ‘मुंबई-पुणे-मुंबई’; प्राजक्ता माळीने तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहातून सादर केली कविता, चाहते म्हणाले…
Marathi actress Shivani sonar will wear panaji nath in wedding
Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
Kavita Medhekar
“चांगल्या घरातील मुली नाटकांत…”, कविता मेढेकर यांनी अभिनयात काम करण्याची परवानगी मागितल्यावर वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाल्या…

प्राजक्ता माळीने ८ ऑगस्टला तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हास्यजत्रेचे सगळे कलाकार तिच्या कर्जत येथील फार्महाऊसवर गेले होते. यावेळी अभिनेते समीर चौघुलेंनी तिचं औक्षण केलं होतं. आता या सगळ्या कलाकारांनी मिळून प्राजक्ताला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “तिचा अहंकार, नखरे…”, अमीषा पटेलबद्दल ‘गदर २’च्या दिग्दर्शकाने मांडलं मत, म्हणाले, “मोठ्या घरची मुलगी…”

वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, ईशा डे या हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने मिळून प्राजक्ताला नृत्याचं चित्र रेखाटलेलं खास पेन्टिंग भेट म्हणून दिलं आहे. चित्राची सुंदर कलाकृती पाहिल्यावर या सगळ्या कलाकारांना प्राजक्ताने धन्यवाद म्हटलं आणि हे पेन्टिंग कर्जत येथील फार्महाऊसवर लावणार असल्याचं सांगितलं.

हेही वाचा : “सणांच्या दिवशी कितीही इच्छा असली तरी…”, मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “काही वैर…”

प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर या गिफ्टची छोटीशी झलक शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने, “वाढदिवसाचं सुंदर गिफ्ट! तुमचे आभार मानेन तेवढे कमीच आहेत. खूप खूप धन्यवाद!” असं म्हटलं आहे. कॅप्शनच्या पुढे या सगळ्या कलाकारांना टॅग करत तिने आभार मानले आहेत. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं नवं पर्व १४ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा सुरु झालेलं आहे.

Story img Loader