मराठी मनोरंजनसृष्टीतील गोड अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जूळून येते रेशीमगाठी’ मालिकेतून प्राजक्ता घराघरांत पोहचली. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. आज प्राजक्ता एका चित्रपटासाठी लाखो रुपयांचे मानधन घेते. मात्र, प्राजक्ताची पहिली कमाई किती होती तुम्हाला माहिती आहे का? एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या पहिल्या कमाईबाबत खुलासा केला आहे.
प्राजक्ताने नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत प्राजक्ताला तुझी पहिली कमाई किती होती असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना प्राजक्ता म्हणाली, “मी खूप लहानपणापासून काम करत आली आहे. सहावी ते सातवीत असताना मी खूप डान्सचे कार्यक्रम केले, त्यावेळी मला कमी पैसे मिळायचे. ‘तांदळा एक मुखवटा’साठी तब्बल चार हजार रुपये मिळाले होते. ही इंडस्ट्रीतली माझी पहिली कमाई होती.”
प्राजक्ता पुढे म्हणाली, मला ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्रा’साठी दर महिन्याला ५८ ते ६० हजार रुपये मिळायचे. या पैशांतून माझा प्रवास खर्च, माझे शिक्षण व माझा इतर खर्च भागत होता. या पैशांतून मी घरी खर्चालाही पैसे देत होते, त्यामुळे त्या कमाईतून मला आनंद झाला होता.
हेही वाचा- हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी सुप्रिया पाठारेंनी विकले सगळे दागिने, म्हणाल्या, “कोणाकडून पैसे…”
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मालिका, चित्रपट, वेबसीरिजमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘तीन अडकून सिताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात तिच्याबरोबर वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्राजक्ताची ‘रानबाजारी’ ही वेबसीरिजही प्रचंड गाजली. आता लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.