अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ची ओळख आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेकविध कारणांमुळे चर्चांचा भाग बनते. कधी तिच्या नवनवीन प्रोजेक्टमुळे, तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट व फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत असलेली दिसते. याबरोबरच प्राजक्ता माळीने केलेली वक्तव्ये बऱ्याचदा चर्चेत असतात. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे होस्टिंग करताना दिसत आहे. यावेळी ती करत असलेल्या कमेंट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधताना दिसते. आता प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाली प्राजक्ता माळी?

अभिनेत्रीने नुकताच सकाळ प्रीमिअरशी संवाद साधला. यावेळी तिने ती जर अभिनेत्री नसती तर तिचे वजन ७० किलो असते असे म्हटले. याबरोबरच मी प्रचंड फूडी आहे, असेही अभिनेत्रीने म्हटले. याच मुलाखतीत अभिनेत्रीने पुढे म्हटले, “तूळ राशीच्या व्यक्तींना एक तरी व्यसन असतंच. कारण ती विलासी रास आहे. मला चहाचे व्यसन आहे. बाकी कुठल्याच पदार्थाला चहाचा मान नाही. मला हल्ली चहाचा त्रास होतोय, पण मी चहा सोडू शकले नाही. पण, मी चहा दोनच कप पिते. मला माझ्या जवळचे लोक ओरडतात. मी त्यांना म्हणते की, दोनच कप चहाने काय त्रास होणार आहे. त्रास होतोय, पण मी मान्य करत नाही”, असे म्हणत चहा प्रचंड आवडत असल्याचे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

बायकांनी बायकांना पाठिंबा…

प्राजक्ता माळीने या मुलाखतीत महिलांनी इतर महिलांना पाठिंबा दिला पाहिजे असे मत व्यक्त करत म्हटले, “बायकांनी बायकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. आपणच किती दिवस समान हक्क पाहिजे वगैरे म्हणत भांडत बसणार? बायका इतर बायकांना समान हक्क देतात का? बाई म्हणून तुम्ही इतर बाईला पाठिंबा देणार नाही, तोपर्यंत आपण इतर जेंडरकडून ती अपेक्षाच करू नये. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. विशेषत: इंडस्ट्रीमधील कॅट फाइट्स जास्त प्रसिद्ध होतात. महिला जरी एकमेकांच्या स्पर्धक असला तरी निखळ मैत्री असू शकते. मला असं वाटतं की, यामध्ये वाढ झाली पाहिजे. जागरूकता निर्माण झाली पाहिजे. बायका-बायकांमधील स्पर्धा, इर्ष्या बाजून ठेऊन मैत्रभाव जास्त आला पाहिजे, तरच बायकांचा स्ट्रगल कमी होईल”, असे म्हणत अभिनेत्रीने महिलांनी इतर महिलांना प्रोत्साहन देणे गरजचे असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: “लग्न झालंय मस्त, आता ओलांडणार माप…”, ‘शिवा’ फेम अभिनेत्याचा थाटात गृहप्रवेश! पत्नीसाठी झकास उखाणा घेत म्हणाला…

काही दिवसांपूर्वीच आणखी एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने मी बॉस असणं अनेकांना खुपलं असे म्हटले होते. याबरोबरच ‘फुलवंती’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्रीने म्हटले होते, “फुलवंती हा टायटल रोल मला मिळाला. या चित्रपटामुळे माझं नृत्यकौशल्य समोर आलं. बऱ्याच लोकांनी माझे बरेच चित्रपट पाहिलेले नाहीत; परंतु हा चित्रपट बहुतांश लोकांनी पाहिला. त्यामुळे माझं अभिनयकौशल्यही लोकांनी पाहिलं. माझं टॅलेंट दिसलं. या चित्रपटामुळे मला निर्माती म्हणून टॅग मिळाला. निर्माती म्हणून पहिला प्रोजेक्ट आणि तोही ‘फुलवंती’चा मिळाला, त्यामुळे मी देवाची ऋणी राहीन”, असे म्हणत अभिनेत्रीने कृतज्ञता व्यक्त केली होती. आता ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.