मराठी कलाविश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. प्रार्थना बेहेरे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनेक कलाकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच आता प्रार्थना बेहेरेची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने तिच्या आणि अभिनेता वैभव तत्ववादीच्या नात्याबद्दल भाष्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि वैभव तत्ववादी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याच्या ऑनस्क्रीन जोडीचे अनेकजण चाहते आहेत. प्रार्थना बेहेरे आणि वैभव तत्ववादी यांच्या जोडीबद्दल विविध चर्चा रंगल्या होत्या. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या आणि एकमेकांना डेट करत असल्याचेही बोललं जातं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थना बेहेरेने यावर मौन सोडत भाष्य केले होते.
आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

प्रार्थना बेहेरेने काही दिवसांपूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला लग्नाबद्दलच्या अफवा याबद्दल प्रश्न विचारला. सोशल मीडियावर नेटकरी अनेकदा विविध अफवा पसरवत असतात. एकदा एका नेटकऱ्याने अभिनेत्याने बरोबर तुझं लग्नच लावलं होतं, तो काय किस्सा आहे, असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना प्रार्थनाने वैभव तत्ववादीबद्दलचा किस्सा सांगितला.

“मी आणि वैभव तत्ववादी आमचं लग्न झालं होतं, असा तो किस्सा आहे. मी आणि सोनाली आम्हीच कुठेतरी गेलो होतो आणि त्यावेळी एका काकूंनी काय तुझं तर आता लग्न झालंय ना…? मी चकित होऊन माझं… असं म्हटलं. हो, वैभव तत्ववादी ना. तर मी नाही… कोणी सांगितलं, असे विचारले.

त्यावेळी आमचा मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा चित्रपट आला होता. त्याचे प्रमोशन सुरु होतं. त्यावेळी त्यांना वाटलं होतं की आमचं लग्न झालं आहे. अगदी आताही मी नेहा म्हणून जेव्हा कुठेही जाते, जरी तेव्हा अभिला माझ्याबरोबर असला तरी यश (श्रेयस तळपदे) दिसत नाही, असे विचारतात. त्यावेळी अनेकदा असं बोलावसं वाटतं की यश माझा नवरा नाही, तर अभिषेक माझा नवरा आहे. पण ते प्रेक्षक आहेत. त्यामुळे ते जे काही बघतात त्यावरुन ते या गोष्टी रिलेट करतात”, असे प्रार्थना बेहेरेने सांगितले होते.

आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

दरम्यान मराठीतील कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना ओळखले जाते. त्यांनी कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ते दोघेही ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात झळकले होते. यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅप लग्न आणि रेडीमिक्स हे दोन चित्रपट केले. या चार चित्रपटानंतर अद्याप ते दोघेही कोणत्याही चित्रपटात झळकलेले नाहीत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prarthana behere answer relationship marriage rumors with vaibhav tatwawadi video nrp