मराठी सिनेसृष्टीतील गोड, सुंदर, सोज्वळ आणि निरागस चेहरा असलेली अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. अनेक विविध धाटणीचे चित्रपट आणि मालिकांमुळे ती घराघरात प्रसिद्धी आहे. प्रार्थना बेहरे ही तिच्या भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. त्याबरोबर तिला तिच्या खळखळून हसण्यासाठीही ओळखले जाते. मात्र खळखळून हसणारी प्रार्थना बेहरे ही रडण्याचे सीन नेमकी कशी करत असेल, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. नुकतंच यामागचे उत्तर समोर आले आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रार्थना बेहरेने ही नुकतंच ‘बस बाई बस’ या कार्यक्रम सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी तिला तिच्या हसण्यावरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान तिला न्यूडल्स बनवायला तरी दोन मिनिटे लागतात. पण तुम्ही एक मिनिटात रडता, हे तुम्ही कसे जमवता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती गंमतीत म्हणाली, ‘मी माझ्या मनात खूप काही साचून ठेवलं आहे.’ त्यावर सुबोध ‘काय साचून ठेवलंय, आम्हालाही कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला आवडेल?’ असे म्हटले. त्यावर तिने नाही म्हटले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

त्यापुढे ती म्हणाली, “पण मला लहानपणापासून आई असं म्हणायची की, तुझ्या डोळ्याच्या जवळ एक नळ फिट केलं आहे. तो कोणी सुरु केला की लगेच रडू येते. खरंच मला लगेच रडू येते. त्यामुळे मी लगेच रडते. मी जर मनापासून एखादी गोष्ट बोलले तर जर मी एखादी गोष्ट मनापासून केली तर मी रडतेच. कदाचित त्या गोष्टी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतात. कारण मी खोटी रडत नाही. मी जेव्हा रडते तेव्हा खरं मला मनातून ते वाटतं. त्यामुळे माझ्या डोळ्यात येतं.”

आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान सध्या प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. प्रार्थनाचा या मालिकेमधील लूक आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खरं तर आपल्यापैकीच एक वाटत आहेत. म्हणूनच तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.