मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. आतापर्यंत ती अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे घराघरात पोहोचली. आता नुकतंच प्रार्थनाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. प्रार्थनाने पती अभिषेकबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ शेअर करत त्यांची पहिली भेट कशी झाली होती? याबद्दल सांगितले आहे.

प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थना ही तिचा पती अभिषेकबरोबर दिसत आहे.

Marathi actress Prajakta Mali visit maha kumbh mela 2025 in prayagraj
Video: प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, अनुभव सांगत म्हणाली, “लहानपणापासूनच…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
video of old couple sells sugarcane juice by doing hardwork
Video : “प्रेम मनापासून असेल तर व्हॅलेंटाईन डे ची गरज नाही!” ऊसाच्या रसाचा गाडा चालवतात आज्जी आजोबा; व्हिडीओ होतोय व्हायरल
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: सिद्धार्थ चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, प्रियांका चोप्राने वहिनीचं ‘असं’ केलं स्वागत, पहिला व्हिडीओ आला समोर
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत प्रार्थना पेटिंग करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांचीही मजा, मस्ती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अभिषेक प्रार्थनाला मिठी मारुन गालावर छान किस करतानाही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना प्रार्थनाने त्यांची पहिली भेट कशी झाली होती, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

प्रार्थना बेहेरेची पोस्ट

“मी – हाच दिवस, हीच वेळ… सहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो.

तो – तुझ्याबरोबर असताना सूर्य अजून मोठा वाटतो आणि चंद्र अधिक सुंदर भासू लागतो. मला तुझ्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. तू जशी आहेस तशीच राहिल्याबद्दल धन्यवाद, त्याबरोबरच मला शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी धन्यवाद. गेली ६ वर्ष खूपच छान होती आणि आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला खरंच खूप भाग्यवान असल्यासारखे वाटते. तुम्पू माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असे कॅप्शन तिने टाकले आहे.

आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान प्रार्थना बेहेरेच्या या व्हिडीओवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीने या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर नेहा पेंडसे, अभिजीत खांडेकर या कलाकारांनीही हार्ट इमोजी शेअर केला आहे.

Story img Loader