प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला बराच काळ उलटला आहे. अनेक जण प्रार्थनाला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. नुकतंच तिने यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

प्रार्थना बेहरे ही नुकतंच बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारला. तू मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने थोडं रागात सुबोध भावेकडे पाहिलं आणि त्यावर तिने चिडक्या स्वरात उत्तर दिले.
आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? असे प्रार्थना त्यांना म्हणाली. त्यावर महिला वर्गाने हे चांगलं आहे, असे म्हटले. त्यापुढे ती म्हणाली, माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना…, हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्या पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे. असे तिने या प्रश्नाला टोलवाटोलवी करत उत्तर दिले.

आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

त्यापुढे तिने प्राण्यांना होणारा त्रास याबद्दल भाष्य केले. यावर बोलताना तिने तिच्या मालिकेतील पहिल्या सीनबद्दल सांगितले. त्यावेळी तिला कशा पद्धतीने रडू कोसळले होते आणि तिच्यातील आई कशी जागृत झाली होती? यावर तिने भाष्य केले. तसेच पुढे तिने ‘मला माझी मुलं नकोत. मी त्यांच्याबरोबर फार खूश आहे’, असे म्हटले.

दरम्यान सध्या प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. प्रार्थनाचा या मालिकेमधील लूक आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खरं तर आपल्यापैकीच एक वाटत आहेत. म्हणूनच तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

Story img Loader