छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर मराठी चित्रपटात झळकताना दिसत आहे. फुलराणी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शनी ही सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच प्रियदर्शनीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
यदर्शनीचा फुलराणी हा चित्रपट बुधवारी (२२ मार्च) प्रदर्शित झाला. या निमित्ताने सिनेसृष्टीतील व्यक्तींसाठी खास प्रिमिअरचे आयोजन करण्यात आले होते. प्रियदर्शनीने नुकतंच एक मुलाखत दिली. त्यावेळी तिला लग्न, अफेअर याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “मला ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’साठी नाकारण्यात आलं होतं” प्रियदर्शनीचा खुलासा, म्हणाली “तेव्हा सचिन सरांनी…”
“मी कधीच अफेअर केलेले नाही. माझे कोणाही बरोबर अफेअर नाही. मी सिंगलच आहे. मी माझ्या वडिलांनी सांगितलेल्या मुलाबरोबरच लग्न करणार आहे”, असे तिने म्हटले.
त्यावेळी तिला तुला कोणी बहिण किंवा भाऊ आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने “मी एकुलती एक आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याला मिळणार आहे”, असे मजेशीर उत्तर दिले.
आणखी वाचा : “तू सोडून दुसरी फुलराणी…” प्रियदर्शनीचा चित्रपट पाहिल्यानंतर वनिता खरातची प्रतिक्रिया
दरम्यान ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुबोध भावे ‘विक्रम’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार ‘सौरभ’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाची ट्रेलर, गाणी सुपरहिट झाली आहेत.