टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं पालक झालं आहे. ‘सुहानी सी एक लडकी’ फेम अभिनेत्री राजश्री रानी व अभिनेता गौरव मुकेश या जोडप्याने गोंडस बाळाचं स्वागत केलं आहे. १ फेब्रुवारी रोजी राजश्रीने बाळाला जन्म दिला. दोघांनी बाळाच्या जन्माबाबत माहिती दिली आहे. राजश्री व गौरव पालक झाल्यानंतर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजश्री रानी आणि गौरव मुकेश यांनी १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी हे दोघे आई-बाबा झाले आहेत. त्यांनी ‘इ-टाइम्स’ला बाळाच्या जन्माची माहिती दिली. आपला आनंद शेअर करताना राजश्री म्हणाली, “आमच्या बाळाचा जन्म १ फेब्रुवारीच्या पहाटे झाला. गौरवने आमच्या बाळाचा जन्म फेब्रुवारीमध्ये व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती, कारण हा प्रेमाचा महिना आहे आणि नेमकं तेच घडलं.”

“तो माझ्या घरी आला अन्…”, जुही चावलाला आमिर खानने दिलेलं सर्वात स्वस्त गिफ्ट; म्हणाली, “घरातील सर्वजण…”

गौरवला बाळाच्या जन्माचा खूप आनंद झाला आहे. त्याने आपल्या मुलाला पहिल्यांदा हातात धरण्याचा त्याचा अनुभव सांगितला. “ती भावना खूप अविश्वसनीय होती. ती शब्दांत सांगता येणार नाही. संपूर्ण नऊ महिने माझ्यासमोरून गेले. तो एक भावनिक क्षण होता. आता मी बाबा झालो आहे. वडील झाल्यामुळे माझ्यात जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे,” असं तो म्हणाला.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

राजश्री व गौरवने अद्याप बाळाचं नाव ठेवलेलं नाही. संयुक्त कुटुंबात निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. त्यामुळे आम्ही अजूनही विचार करत आहोत, कारण आमच्याकडे त्याच्या जन्म प्रमाणपत्रासाठी नोंदणी होईपर्यंत आणखी एक महिना आहे, असं राजश्रीने सांगितलं.

राजश्री व गौरव एकमेकांना ‘सुहानी सी एक लडकी’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. यात गौरवने सुहानीच्या बहिणीच्या नवऱ्याची भूमिका केली होती. शूटिंगदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. २०२० मध्ये गौरवने राजश्रीला प्रपोज केलं, राजश्रीने होकार दिला आणि नंतर दोघांचं लग्न झालं. आता लग्नानंतर चार वर्षांनी ते पालक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rajshri rani and actor gaurav mukesh welcome baby boy hrc