अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी ती तिचं वैयक्तिक आयुष्य आणि आदिल खान दुर्रानीशी केलेल्या लग्नामुळे चर्चेत होती. आदिलशी लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बदलून फातिमा असं ठेवलं. रमजानच्या महिन्यात आता तिने रोजाही ठेवला. तर आता तिने नमाज पठण करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यामुळे नेटकरी तिच्यावर नाराज झाले आहेत.
काल तिने तिचा नमाज पठण करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तिने पोस्ट करताच खूप चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष राखीने नमाज पठण करताना परिधान केलेल्या कपड्यांकडे गेलं आणि त्यावरून ती चांगलीच ट्रोल होत आहे.
आणखी वाचा : “सर्व धर्मांची थट्टा…”; राखी सावंतकडून मोडला गेला रोजा, कारण ऐकताच संतापले नेटकरी
या व्हिडीओमध्ये नमाज पठण करताना राखीने काळ्या रंगाच्या सूटवर हिजाब परिधान केलेला दिसत आहे. पण नमाज पठण करताना तिने असे कपडे परिधान केलेलं अनेक नेटकऱ्यांना खटकलं. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी यावर टीका करायला सुरुवात केली.
हेही वाचा : “आदिलने माझे न्यूड व्हिडीओ काढले आणि…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा
एका नेटकाऱ्याने लिहिलं, “राखी, असे कपडे घातल्याने नमाज होत नाही. तुझी सलवार पायाच्या घोट्यापर्यंत असायला हवी.” तर दुसऱ्याने लिहिलं, “राखी, तू नमाज पठण करतेस ही चांगली गोष्ट आहे, पण ते करताना पूर्ण कपडे परिधान केले पाहिजेत. तुझी सलवार खूप लहान आहे, त्यामुळे नमाज होणार नाही.” तर आणखी एकाने लिहिलं, “ती नमाज पठण करत नाहीये. ती फक्त नमाज पठण करत असल्याचा अभिनय करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.” याचबरोबर नमाज पठण करताना तिने नेलपेंट लवल्यामुळेही अनेकांनी संताप व्यक्त केला. तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.