बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही कायमच काही ना कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा दुसरा पती आदिल खान यांच्यात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. त्याबरोबरच राखी सावंतचे नवीन एक गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच राखी सावंत ही तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे.
नुकतंच ‘विरल भय्यानी’ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी सावंत ही एका गाडीतून खाली उतरत असल्याचे दिसत आहे. यावेळी ती पापाराझींना पाहून अरे कुठे तरी मला सोडा, असे बोलताना दिसत आहे. तसेच अरे मी आता जीमवरुन आलीय, माझे कपडे तरी बघा. माझे केस पाहा, मी चांगली दिसत नाही, असे बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : “चुकीच्या मार्गाने…” राखी सावंतने पती आदिल खानकडून मागितली दीड कोटींची रक्कम
यावेळी राखीने गुलाबी रंगाचे जीमचे कपडे परिधान केले होते. तिचे हे कपडे अगदी बॉडी फिटिंग होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावेळी पापाराझींशी बोलताना करत असलेल्या हावभावामुळेही ती ट्रोल झाली आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष
राखीचा हा व्हिडीओ पाहून एकाने ‘ओव्हरअॅक्टिंग की दुकान’, असे म्हटले आहे. ‘मला वाटलं की मी थायलँडला आलो आहे’, अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘हिने डायपर का घातला आहे’, असा प्रश्न कमेंट करत विचारला आहे. ‘आदिलबरोबर असताना ही चांगले कपडे घालायची, आता परत ती तिच्या मूळ कपड्यात आली’, अशी कमेंट एकाने केली आहे.