क्रिकेटपटू शुबमन गिलच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. शुबमन गिलचं नाव सारा तेंडुलकरशी जोडलं जात होतं, पण आता तो एका टीव्ही अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘बहु हमारी रजनीकांत’ फेम रिद्धिमा पंडितशी शुबमन डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहे, त्यांच्या लग्नात नो फोन पॉलिसी असेल अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर येत होत्या, पण आता रिद्धिमानेच लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

२४ वर्षीय शुबमनशी लग्नाच्या चर्चा ऐकून ३३ वर्षीय रिद्धिमाने संताप व्यक्त केला आहे. लग्नाच्या चर्चांना तिने हास्यास्पद म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपण शुबमनला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, असं तिने सांगितलं. ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली, “मला वाटतंय की या सगळ्या काही लोकांच्या कल्पना आहेत. कोणीतरी एक गोष्ट तयार करतं आणि मग ती सोशल मीडियावर व्हायरल होते. मी शुबमन गिलला वैयक्तिकरित्या ओळखतही नाही. त्यामुळे लग्नाच्या चर्चा हास्यास्पद आहेत. माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सकाळपासून मेसेज येत आहेत पण मी या सर्व गोष्टी खोट्या आहेत, हे सांगून कंटाळले होते, त्यामुळे शेवटी मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.”

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

रिद्धिमाने शेअर केला होता व्हिडीओ

शुबमनशी लग्नाच्या अफवा सुरू झाल्यावर रिद्धिमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ तिने नंतर डिलीट केला होता. त्या व्हिडीओमध्ये रिद्धिमाने तिला लग्नाच्या बातमीबद्दल विचारण्यासाठी पत्रकारांचे खूप फोन आले असं म्हटलं होतं. “पत्रकारांच्या खूप साऱ्या फोन कॉल्सने मला जाग आली. यापूर्वी असं कधीच घडलं नाही आणि त्यांच्यापैकी अनेकांना माझ्या लग्नाबद्द जाणून घ्यायचं आहे. पण कोणाशी? माझं लग्न होणार नाहीये, लग्नाबद्दल काही बातमी असेल तर मी स्वतःच त्याबद्दल जाहीर करेन, पण आता तरी तसं काहीच घडत नाहीये, बाय,” असं ती या व्हिडीओमध्ये म्हणाली होती.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

रिद्धिमा पंडित कोण आहे?

रिद्धिमा पंडितने २०१६ मध्ये ‘बहू हमारी रजनी कांत’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. मात्र याआधी तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केलं आहे. तिच्या डेब्यू शोसाठी तिला गोल्ड अवॉर्ड देण्यात आला होता. तिने रिॲलिटी शो देखील केले आहेत. तिने ‘खतरों के खिलाडी ९’ मध्ये भाग घेतला होता, ती या शोची दुसरी रनर अप होती. तर ती ‘बिग बॉस ओटीटी सीझन १’ मध्ये सहभागी झाली, पण ती लवकरच एव्हिक्ट झाली होती.

Story img Loader