मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वात तिच्याबरोबरच तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे हा देखील सहभागी झाला होता. रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी गोडीगुलाबीने बिग बॉसच्या घरात दिसली. पण नंतर त्यांचे खटके उडाले. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही रंगताना दिसल्या. पण आता अखेर रोहित-रुचिरा या दोघांचे पॅचअप झाले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिरामध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यातील वाद देखील वाढत गेला. त्यात रुचिरा नॉमिनेट झाल्याने तो वाद आणखी चिघळला. या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर रुचिराने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. त्यामुळे रोहित-रुचिराच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले. पण आता त्या दोघांच्या नात्यात सर्व काही आलबेल असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

बुधवारी (२५ जानेवारी) गणेश जयंतीच्या निमित्ताने रुचिराने एक स्टोरी शेअर केली होती. यात ती कुडाळमधील एका मंदिरातील गणपती बाप्पाची पूजा करताना पाहायला मिळाली. “माघी गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया -सिद्धिगणपती मंदिर, कुडाळ”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

रुचिरा जाधवच्या या पोस्टला रोहित शिंदेने लाईक केले आहे. विशेष म्हणजे रुचिरा लवकरच रोहित शिंदेला पुन्हा फॉलो करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला

दरम्यान रुचिरा आणि रोहित हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रुचिराच्या बहिणीच्या लग्नातही त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती. रोहित आणि रुचिराची ओळख एका फोटोशूटमुळे झाली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर त्यांच्यात वाद पाहायला मिळाला. मात्र आता अखेर ते दोघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader