बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची सध्या चर्चा आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले. या वादानंतर सुरुवातीला रुचिरा जाधव ही घराबाहेर पडली. त्यानंतर काही आठवड्यांनी रोहित शिंदे हा बाहेर पडला. सध्या त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. आता रुचिराने रोहितबद्दल स्पष्ट वक्तव्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यातील वाद आणखी चिघळला. या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता रुचिराने रोहितच्या आणि तिच्या नात्यात काहीही नीट नसल्याचे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली
रुचिरा ही इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असते. नुकतंच रुचिराने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. यावेळी अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या होत्या. यात एका नेटकऱ्याच्या कमेंटने आणि रुचिराच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एका नेटकऱ्याने रुचिराला रोहित आणि तुझ्यात जे काही झाले ते विसरुन जाण्याचा सल्ला कमेंटद्वारे दिला होता. त्यावर तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
“लव्ह यू रुचिरा… तू वैचारिक मुलगी आहे, याची मला जाणीव आहे. तू रोहितमुळे दुखावली गेलीस, पण तो एक खेळ होता असा विचार करुन हे सर्व सोडून दे. रोहितबरोबर आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात कर. काही गोष्टी गुंतागुंतीच्या करण्यापेक्षा त्याला माफ कर. तो असा पुन्हा कधीही वागणार नाही. तो त्याच्या चुकांमधून नक्कीच शिकेल. तू या गोष्टींचा सकारात्मक पद्धतीने विचार करशील याची मला खात्री आहे”, असा सल्ला एका नेटकऱ्याने रुचिराला दिला आहे. त्यावर रुचिराने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
“तुम्हाला माझ्याबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेमासाठी तुमचे खरंच खूप आभार. एखाद्याला माफ करणं ही खरच खूप मोठी गोष्ट असते. माफ करणं म्हणजे खऱ्या प्रेमाचे लक्षण मानले जाते. यात एका माणसाला त्याची चूक समजते आणि तो माफी मागतो, तर दुसरा व्यक्ती हा त्याला प्रेमापोटी माफ करतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याची चूक मान्यच नसेल तर किंवा त्याने काय चूक केलीय हेच त्याला माहिती नसेल तर अशावेळी काय करावे?
बरं जे घडलंय त्याची तीव्रता जे दिसलंय त्यापेक्षा १०० पटीने जास्त आहे २४ तासांमधील १ तास भाग दाखवला जातो. बरं माझ्यासाठी ३ वर्षात समजलेला लाईफ पार्टनर विरुद्ध ६ आठवड्यात दिसलेला नवा चेहरा इतकं साधं वाटणारं कठीण गणित आहे. बरं ते सोडवण्यासाठी मी समर्थ आहे. पण एक स्त्री म्हणून जे अडथळे येतात ते दुर्दैवाने कोणत्याही स्त्रीला चुकलेले नाहीत. पण मी एवढंच म्हणेन की स्वाभिमान कधीच सोडायचा नाही. आपण जर सत्याच्या बाजून असू तर कधी डगमगायचं सुद्धा नाही. आपण नेहमीच स्वत:वर विश्वास ठेवायला हवा आणि त्याबरोबर देवावरही. बाकी माझा कान्हा सांगतो तसं… हर बात समझाना सदा संभव नही सखी, समय समझायेगा… आणि माझ्या त्यावर विश्वास आहे”, असे तिने म्हटले आहे.
आणखी वाचा : “तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला
दरम्यान रुचिराच्या या कमेंटने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या ती या कमेंटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी तिचे समर्थन केले आहे.