बिग बॉस मराठीचे चौथे पर्व हे सुपरहिट ठरताना दिसत आहे. यंदाच्या पर्वाची सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले. या वादानंतर सुरुवातीला रुचिरा जाधव ही घराबाहेर पडली. त्यानंतर काही आठवड्यांनी रोहित शिंदे बाहेर पडला. सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली आहे. त्यात रुचिराने शेअर केलेल्या एक पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर रोहित आणि रुचिरा एकमेकांबरोबर छान मिळून मिसळून राहत होते. पण काही दिवसांनी टास्क खेळताना, घरात वावरताना त्यांच्या मतभेद झाले. त्यांचा हा वाद वाढतच गेला. रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यातील वाद आणखी चिघळला.
आणखी वाचा : “३ वर्षात समजलेला लाईफ पार्टनर विरुद्ध ६ आठवड्यातला नवा चेहरा…” रोहितला माफ करण्याबद्दल रुचिरा जाधवचे स्पष्ट विधान
या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर तिने काहीही केलं तर मी त्याला फॉलो करणार नाही, असेही जाहिरपण सांगितले. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडल्याची बोललं जात आहे. त्यातच आता रुचिराने रोहितच्या आणि तिच्या नात्यात सर्व काही बिनसल्याचे संकेत दिले आहेत.
रुचिराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या हस्ताक्षरातील काही ओळी लिहिल्या आहेत. या ओळी हिंदीत असून तिने रात्री पावणेदोनच्या सुमारास त्या लिहिल्या आहेत. “सत्य तुला माहित आहे, तेच सत्य मला माहिती आहे. पण सत्य तर हे आहे की सत्य फक्त मला ठाऊक आहे. पण तू सत्य मानणार नाहीस आणि मी ते सोडणार नाही”, असे तिने यात म्हटले आहे. या बरोबरच तिने तिची सही, आजची तारीख आणि वेळ असेही लिहिले आहे.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली
दरम्यान रुचिराच्या या कमेंटने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या ती या कमेंटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी तिचे समर्थन केले आहे.