छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव ही कायमच चर्चेत असते. रुचिरा जाधव ही बिग बॉस मराठीमुळे सातत्याने चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले, सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली. रुचिराने त्याला अनफॉलो केले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुचिरा याबद्दल विविध पोस्ट करताना दिसत आहे. आता रुचिराने नववर्षाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने नवीन वर्षाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या बिग बॉस आणि रोहित शिंदेबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “तू सत्य मानणार नाहीस आणि…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“२०२२ मध्ये तुम्ही कितीही दुःखी झाला असाल तरीही ते अश्रू २०२३ मध्ये तुम्हाला त्या दुःखातून बाहेर येण्यास उभारी देतील”, अशा आशयची पोस्ट तिने शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुचिराची ही पोस्ट रोहित शिंदेबद्दल असल्याचा अंदाज अनेकजण वर्तवत आहेत.
दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर रोहित आणि रुचिरा एकमेकांबरोबर छान मिळून मिसळून राहत होते. पण काही दिवसांनी टास्क खेळताना, घरात वावरताना त्यांच्या मतभेद झाले. त्यांचा हा वाद वाढतच गेला. रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यातील वाद आणखी चिघळला.
या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर तिने काहीही केलं तर मी त्याला फॉलो करणार नाही, असेही जाहिरपण सांगितले. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडल्याची बोललं जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुचिरा ही रोहितच्या आणि तिच्या नात्यात सर्व काही बिनसल्याचे संकेत देताना दिसत आहे. तर दुसरीकडे रोहितने यावर मौन बाळगले आहे.