अभिनेत्री रूपाली भोसले ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये ती संजना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक होतं. आता तिने या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर करत अभिनय करताना कसा कस लागतो हे दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रुपालीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे आणि त्यांच्या सेटवर शूटिंगदरम्यान काय गमती जमती घडत असतात हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. रूपालीही सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना याबद्दलचे अपडेट्स देत असते. आता तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : “माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

या व्हिडीओमध्ये रुपाली कॉफी पीत असताना वाक्यांना रिअॅक्ट करताना दिसत आहे. त्यावेळी तिला कोणतेही संवाद नाहीत. हा व्हिडीओ पोस्ट परत तिने लिहिलं, “अभिनय म्हणजे प्रतिक्रिया देणं आहे आणि ते तेव्हाच चांगलं होतं जेव्हा आधी तुम्ही चांगले श्रोते असता. मगमध्ये कॉफी किंवा चहा नसून त्यात पाणी आहे. मी अनेकदा हा अनुभव घेतला आहे की, मोठे सीन्स असतात तेव्हा आपल्या लाइन्स आहेत का आधी ते बघायचं आणि असल्या की तेवढ्या पाठ करायच्या. पण नसल्या की, ती स्क्रिप्ट परत करून टाकायची. मग संवाद नाहीत, तर माझं नाव स्क्रिप्टमध्ये लेखकाने का लिहिलंय याचा विचार कायमच नाही करायचा. पण माझा विचार कायमच वेगळा होता आणि राहील. मला वाटतं जेव्हा जेव्हा आपल्याला सीनमध्ये वाक्य नसतात तेव्हा जबाबदारी आणखी वाढते.”

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “लेखकाने माझं नाव लिहिलंय म्हणजे माझं तिथे असणं महत्त्वाचं आहे. सीनमध्ये माझ्या तोंडी वाक्य नसली तरीही माझ्या रिअॅक्शन्स महत्त्वाच्या आहेत आणि त्या मी तेवढ्याच प्रामाणिकपणे देणार आणि द्यायलाही हव्यात. बऱ्याचदा प्रेक्षक म्हणून माझंसुद्धा डायलॉग म्हणणाऱ्या कलाकारापेक्षा त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या कलाकाराकडे लक्ष असतं. हा व्हिडीओ मोठा आहे. मी तो मुद्दाम एडिट केला नाही. गेली अनेक वर्षं मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि एक गोष्ट मी कायम माझ्यासोबत ठेवली आहे, ती म्हणजे प्रामाणिकपणा. खऱ्या आयुष्यात किंवा कामात कॅज्युअल अप्रोच मला कधीही पाटला नाही आणि आवडला नाही. म्हणूनच तो कधी माझ्या कामातही आला नाही. या इतक्या वर्षांच्या प्रवासात अनेक अनुभव, अनेक लोक आले आणि ते मला खूप काही शिकवून गेले. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचं स्वागत केलं तर आपण काय करू नये हा विचार करायला मदत झाली. असो, बाकी सगळं उत्तम!” आता तिची ही पोस्ट चाहत्यांना आवडली असून यावर कमेंट्स करत नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.