मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांची शेअर करत असते. त्यावर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत असतात. आता तिने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत तिला ट्रोल करणाऱ्याला ऋतुजाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी ती चाहत्यांना सांगत असते. काही दिवसांपूर्वी तिने लाल रंगाचा सुंदर गाऊन परिधान करून एक फोटोशूट केलं. त्यातील एक फोटो तिने काल तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. तिने तो फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचा हा ग्लॅमरस अंदाज आवडल्याचं सांगितलं. पण एका नेटकऱ्याने मात्र या फोटोवर नकारात्मक कमेंट केली.
आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “नक्की मल्लिका शेरावत बनायची इच्छा आहे वाटतं.” त्यावर ऋतुजाच्या एका चाहत्याने लिहिलं, “सॉरी पण तुम्ही कपड्यांवरून जज कसे काय करू शकता? आणि मल्लिका शेरावत होण्यासारखा नाही हा आउटफिट.” त्यावर ऋतुजाने तिची बाजू घेत कमेंट केलेल्या चाहत्याचे आभार मानत लिहिलं, “थँक यू आणि सरड्याची धाव कुंपणापर्यंत… त्यांनी फक्त तिचे चित्रपट पाहिले असतील किंवा त्यांची आवडती असेल म्हणून तीच आठवली असेल पटकन. सरड्याची धाव कुंपणापर्यंत… आपण लक्ष नाही द्यायचं.”
हेही वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत
ऋतुजाच्या पोस्टवरील या कमेंट्सने सर्वांचंच लक्ष वेधलं. ऋतुजाच्या कमेंटला अनेकांनी लाईक करत तिच्याशी सहमतीही दर्शवली. तिची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे.