मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर बस सेवा खूप सुलभ आहे. अनेक जण टॅक्सीच्या ऐवजी बसने फिरणं पसंत करतात. यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे. पण, आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बेस्ट बसचालकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो बसचालक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे.

हे दृश्य सर्वांसमोर आणणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजा बागवे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिच्या कामाबरोबरच तिला समाजातील खटकणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
speed of vehicles on Mumbai Pune Expressway will now be controlled by AI based cameras
सावधान! आता ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई… कोठे आणि कशी यंत्रणा ?
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री

आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

ऋतुजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेस्टच्या बसमधून मुंबईत प्रवास करताना दिसली. तिची बस एका सिग्नलवर थांबली असताना बसचा चालक मात्र मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “बेस्ट.” तिने समोर आणलेलं हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत

दरम्यान, ऋतुजा काही दिवसांपूर्वी ‘अथांग’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आता ऋतुजा कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये झळकणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader