मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कलाकारांना कास्टिंग काऊचची समस्या सतावत आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. आतापर्यंत अनेकांनी कास्टिंग काऊचच्या त्यांना आलेल्या अनुभवावर खुलेपणाने भाष्य केलं आहे. आता मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा सावंत हिने तिच्या बाबतीत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
नुकतीच तिने मीडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला एकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे,” असं तिने सांगितलं. त्याचबरोबर ती तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक घटना होती असंही ती म्हणाली.
ऋतुजा म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऑडिशन देणे सामान्य आहे. मी वयाच्या २० व्या वर्षी कामाच्या शोधात होते. एके दिवशी मला एका एजंटचा फोन आला आणि त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी यायला सांगितले. मी कामाबाबत चर्चा करण्यासाठी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले तेव्हा तो माझ्या जवळ आला. त्याने मला धरून त्याच्याजवळ ओढलं आणि या सगळ्या घटनेने मी खूप घाबरले. त्यावेळी मी तेथून पळ काढला.”
पुढे ती म्हणाली, “त्या घटनेतून मी महत्वाची गोष्ट शिकले की आता मी कोणाला भेटताना जास्त काळजी घेते. मीटिंग्सना जाताना मी नेहमी कोणालातरी माझ्यासोबत घेऊन जाते, विशेषत: ज्यांना मी ओळखत नाही त्यांना भेटण्यापूर्वी त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेते.”
ऋतुजा सावंतने ‘मेहंदी है रचने वाली’, ‘छोटी सरदारनी’ आणि ‘पिशाचिनी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘मेहंदी है रचने वाली’ या मालिकेतून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती.