अभिनेत्री संभावना सेठ सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती बिनधास्त व्यक्त होते. हिंदी ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे संभावना प्रकाशझोतात आली. मध्यंतरी आपण आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त असल्याचं तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं. आता आणखी एक भावुक व्हिडीओ संभावनाने शेअर केला आहे. संभावनाच्या श्वानाचा मृत्यु झाला आहे. त्याच्या जाण्याने संभावना पूर्ण कोलमडून गेली आहे.

संभावनाचा श्वान ‘कोको’ जवळपास २० वर्षांपासून तिच्याबरोबर होता. याबाबत तिने भावुक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. ती म्हणाली, “जड अंतःकरणाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की १४ ऑक्टोबरला सकाळी ६.३०वाजता आमचा मुलगा कोकोचं निधन झालं. हे दुःख खरंच खूप वेदना देणारं आहे. कोको आमच्याबरोबर जवळपास २० वर्ष होता.”

पुढे ती म्हणाली, “इतकंच नव्हे तर माझ्या लग्नाआधीच तो आमच्याबरोबर आहे. त्याने आम्हाला खूप काही दिलं आहे. कोको आमचा सगळ्यात प्रेमळ मुलगा होता आणि नेहमीच तो आमचा राजकुमार राहिल.” संभावनाने ही भावुक पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तसेच काही सेलिब्रिटी मंडळींनीही यावर तुझ्या दुःखामध्ये सहभागी आहोत अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – आधी आई गेली अन् १४ दिवसांनी बाबाही… ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ वेदनादायी प्रसंग

संभावनाने तिच्या युट्युब चॅनलद्वारे आपल्या श्वानाबरोबरचा भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपला नवरा अभिनेता-लेखक अविनाश द्विवेदीबरोबर दिसत आहे. कोकोला कुशीत घेऊन ती बसली असल्याचं दिसत आहे. तसेच त्याला ऑक्सिजन लावलं असल्याचंही व्हि़डीओमध्ये स्पष्टपणे दिसतं. संभावना आणि तिचा पती कोकोच्या निधनामुळे कोलमडून गेले आहेत.

Story img Loader