अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तर आता ती ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी त्याचं गिरगावमधील घर सोडल्याचा खुलासा केला.

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका म्हणजे दोन बहिणींची गोष्ट आहे. गेली अनेक दिवस या मालिकेची टीम या मालिकेचं खूप प्रमोशन करत होते. नुकतीच त्या सर्वांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. त्यावेळी शर्मिष्ठाने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी केलेल्या सगळ्यात मोठ्या गोष्टीबद्दल भाष्य केलं.

actress Radhika wife of HD Kumaraswamy former Karnataka CM
पळून जाऊन बिझनेसमनशी केलं लग्न, मग २७ वर्षांनी मोठ्या नेत्याबरोबर थाटला दुसरा संसार; माजी मुख्यमंत्र्यांची बायको आहे अभिनेत्री
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
balveer fame dev joshi got engaged
गणरायाच्या साक्षीने नवीन सुरुवात! २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो

आणखी वाचा : “आमचं पहिलं बाळ…” शर्मिष्ठा राऊतने सुरु केली नवी इनिंग, पोस्ट चर्चेत

होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर शर्मिष्ठाला विचारतात, “तुला सगळं ठाण्यातच मिळालं? त्यावर शर्मिष्ठा म्हणते, “हो.” त्यानंतर आदेश बांदेकर विचारतात, “कसं काय पण?” यावर शर्मिष्ठा म्हणते, “माझा नवरा गिरगावचा आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा माझी अट होती की, मी ठाणे सोडणार नाही. यावर तो म्हणाला होता, नो प्रॉब्लेम. मी ठाण्यात येतो. मग तो गिरगाव सोडून ठाण्यात आला.”

हेही वाचा : Video: “माझी मालिकेतून एग्झिट झाली आणि…”, ‘अशी’ आहे खुशबू तावडे-संग्राम साळवी यांची लव्हस्टोरी, अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतने २०२० मध्ये तेजस देसाईशी लग्नगाठ बांधली. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सोशल मीडियावर सक्रिय राहून ते अनेकदा एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Story img Loader