‘बिग बॉस’ हिंदीच्या घरात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदला ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक बनविल्यामुळे अनेक अभिनेत्रींनीही या विरोधी भूमिका घेतली होती. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप करत त्याला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून संताप व्यक्त केला होता. आता शर्लिनने थेट केंद्रीय मंत्र्याला याबद्दल पत्र लिहिलं आहे.

शर्लिनने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस’चं प्रसारण बंद करण्याची विनंती केली आहे. याबद्दल तिने ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. “केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरातून काढा आणि जोपर्यंत साजिदला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत या शोचं प्रसारण बंद करावे, अशी मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करत आहे. देशातील महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या प्रतिष्ठेशिवाय कोणत्याही चॅनेल किंवा शोचा टीआरपी महत्त्वाचा नाही. साजिदला शोमधून काढून टाकण्यासाठी आम्ही बिग बॉसलादेखील विनंती केली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. कृपया, तुम्ही या पत्राकडे आणि आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नका”, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> मराठी अभिनेत्रीने १०×२०च्या जागेत बांधलं नवं घर, पोस्ट शेअर करत म्हणाली “दोन वर्षांपासून…”

हेही वाचा >> करवा चौथच्या दिवशी मंगळसूत्राचं ब्रॅण्डिंग केल्यामुळे शिबानी दांडेकर ट्रोल, नेटकरी म्हणाले “तू संस्कृतीचा…”

शर्लिनने मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘बिग बॉस’च्या घरात साजिदला पाहून तिने पुन्हा त्याच्यावर आरोप करत संताप व्यक्त केला होता. “साजिदने मला त्याचे गुप्तांग दाखवून त्याला शून्य ते दहामध्ये रेटिंग द्यायला सांगितले होते”, असं ती म्हणाली होती. साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं. ‘बिग बॉस’मधून साजिद खानला काढून टाकण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती.

Story img Loader