छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहल शिदम सध्या चर्चेत आहे. स्नेहलने तिच्या सोशल मीडियावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबर फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे त्या दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता अभिनेत्री श्रेया बुगडेने स्नेहलच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
स्नेहलने निखिल बनेबरोबर शेअर केलेल्या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.श्रेया बुगडेही स्नेहलचा हा फोटो पाहून आश्चर्यचकित झाली आहे. “मला तू काहीच सांगितलेलं नाहीयेस. माझ्या मेकअपरुममध्ये लगेच ये” अशी कमेंट तिने केली आहे.
हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतच्या वकिलाची प्रतिक्रिया, म्हणाले “पती-पत्नीच्या नात्यात…”
निखिल बने व स्नेहल शिदमने अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यातील हा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यांचा हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्नेहल व निखिलच्या या फोटोवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा>> “ए शेंबडी…” ‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदने केलेलं ट्वीट चर्चेत
स्नेहल शिदमने कॉलेज जीवनापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘चला हवा येऊ द्या’मुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने ‘भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, ‘देवमाणूस २’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘बॉईज २’ चित्रपटातही ती झळकली होती. तर निखिल बने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.