‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशात सुद्धा या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमाद्वारे अभिनेत्री शिवाली परबला नवी ओळख मिळाली. सोशल मीडियावर शिवाली कायम सक्रिय असते. शिवालीने खास व्हिडीओ शेअर करीत आपल्या आईला ‘मदर्स डे’च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मदर्स डे’च्या निमित्ताने शिवाली परबने आपल्या आईसाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला शिवाली आपल्या आईची ओळख करून देताना म्हणते, “नमस्कार, मी शिवाली परब आणि ही माझी आई दीपाली परब.” शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील काही फुटेजेस सुद्धा या व्हिडीओमध्ये जोडली आहेत. यामध्ये शिवालीचे कार्यक्रमादरम्यान कौतुक करीत असताना तिची आई किती आनंदी होते तो प्रसंगही अभिनेत्रीने अधोरेखित केला आहे.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचे ‘मराठी’ प्रेम चर्चेत; ‘मदर्स डे’निमित्त केली खास पोस्ट
शिवाली व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “आई तू खूप लहान, निष्पाप, खूप जास्त प्रेमळ आहेस. तू खूप सुंदर दिसतेस आणि त्यापेक्षाही तू मनाने खूप सुंदर आहेस…तुला ‘मदर्स डे’च्या खूप शुभेच्छा आई.” तिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांनी सुद्धा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुझी आई खरंच खूप सुंदर आहे…” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “तुम्ही दोघी अशाच कायम खूश राहा.”
हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत धर्मेंद्र यांचा खुलासा; म्हणाले, “त्या दोघांकडे पाहून…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात साकारत असलेल्या शिवालीच्या प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करताना दिसतात. यामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.