‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायरा ही भूमिका साकारून अभिनेत्री शिवांगी जोशी लोकप्रिय झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच बातम्या येत आहेत. शिवांगी अभिनेता कुशाल टंडनबरोबर एंगेजमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवांगीने कुशालबरोबर ‘बरसातें’ ही मालिका केली होती आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
शिवांगी आणि कुशाल ‘बरसातें’ ही मालिका करत असताना त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. हा शो बंद झाला, पण तरीही अनेकदा कुशाल व शिवांगी एकत्र दिसतात. गेल्या काही दिवसांपासून तर या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा होत होत्या. २६ वर्षांची शिवांगी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ३९ वर्षीय कुशाल टंडनशी एंगेजमेंट करणार असं म्हटलं जात होतं, या सर्व चर्चांवर आता शिवांगीने मौन सोडलं आहे.
धर्मेंद्र यांच्यासोबत ४४ वर्षांचा संसार, पण कधीच सासरी गेल्या नाहीत हेमा मालिनी; जाणून घ्या कारण
शिवांगी जोशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली असून त्यात तिने अफवांचा उल्लेख केला आहे. तसेच थेट विषयाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे साखरपुड्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. शिवांगीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “मला अफवा आवडतात. मी नेहमी माझ्याबद्दल अशा गोष्टी ऐकते, ज्या मलाही माहित नाहीत,” असं लिहिलं आहे.
![shivangi joshi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/05/shivangi-joshi.jpeg?w=298)
कुशालबरोबर फोटो शेअर करत असते शिवांगी जोशी
शिवांगी जोशी अनेकदा कुशाल टंडनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दोघेही एकत्र छान दिसतात आणि त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडते.
रणदीप रायशी जोडलं गेलं होतं शिवांगीचं नाव
यापूर्वी शिवांगी जोशीचे नाव ‘बालिका वधू २’ मधील तिचा सहकलाकार रणदीप रायसोबतही जोडलं गेलं होतं. पण शिवांगी आणि रणदीप दोघांनीही आपण फक्त चांगले मित्र असल्याचं म्हटलं होतं.
मोहसिन खान-शिवांगी जोशीचं होतं अफेअर
शिवांगी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम करत होती, तेव्हा तिचं नाव मोहसिन खानसोबत जोडलं गेलं होते. शिवांगी आणि मोहसिनने नात्याची कबुली दिली होती, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. शिवांगी आणि मोहसिनने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये जवळपास सहा वर्षे काम केलं होतं. या दोघांनी नायरा आणि कार्तिकच्या भूमिका केल्या होत्या. नंतर नायराचे निधन झाले आणि शिवांगीने नायरासारखीच दिसणाऱ्या सीरतची भूमिका केली होती. शिवांगी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहे. ती तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असते.