‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. याचबरोबर या सर्व कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांना भावली आहे. या कलाकारांमधील ऑफस्क्रीन बॉन्डिंगही खूप छान आहे. तर आता या मालिकेच्या निमित्ताने कविता मेढेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शिवानीने सांगितला आहे.
या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर नेहमी सोज्वळ भूमिकामध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री कविता मेढेकर यामध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्या भुवनेश्वरी हे पात्र साकार आहेत. पडद्यावर त्यांचं पटत नसला तरीही पडद्यामागे त्यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे.
आणखी वाचा : ‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”
शिवानीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांची संवाद साधला. “अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा तुम्हाला कसा वाटला?” असा प्रश्न तिने तिच्या चाहत्यांना विचारला. त्याला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर या दरम्यान एकाने लिहिलं, “तुमचे आणि कविता मॅमचे सीन्स बघायला खूप मज्जा येते…उत्तम बॉण्डिंग.” त्यावर उत्तर देत शिवानीने तिचा कविता मेढेकरांबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं, “आम्हाला एकत्र काम करतानाही खूप मज्जा येते. तिच्या रूपाने मला माझी मैत्रीण सापडली.”
तर आता शिवानीने पोस्ट केलेली ही स्टोरी खूप चर्चेत आली आहे. आता तिचे चाहते या मालिकेच्या पुढील भागांबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.