अभिनेत्री तेजश्री प्रधानची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत राज हंचनाळे, इरा परवडे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर हे कलाकार झळकत आहे. या मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर अभिनेत्री सखी गोखलेने प्रतिक्रिया दिली आहे.

सखी गोखलेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यावेळी तिने मालिकेतील आणि शूटींगच्या वेळीचे काही फोटो कोलाज केले आहेत. त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

“नुकताच मी ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा पहिला एपिसोड काल रात्री पाहिला. अम्मा तू भारी काम केलंस. काय भारी एपिसोड आहे. फारच छान. अजून काही भाग पाहायला नक्कीच आवडेल.

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका नक्कीच बघा. उत्तम लेखन, दिग्दर्शन, डिझाईन आणि कलाकार. टीमला खूप खूप शुभेच्छा”, अशी पोस्ट सखी गोखलेने केली आहे.

sakhi gokhale
सखी गोखले

आणखी वाचा : Video : प्राजक्ता गायकवाडने लुटला मंगळागौरीचा आनंद, फुगड्या खेळतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ‘ये है मोहेब्बतें’चा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे.

Story img Loader