मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडद्या गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखलेंना ओळखलं जातं. शुभांगी गोखले यांची मुलगी सखीसुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. नुकतचं एका मुलाखतीत शुभांगी गोखले यांनी सखीबाबत मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा- “…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा
एका मुलाखतीत शुभांगी यांना तुम्ही तयार होताना किंवा सजताना सखी मदत करते का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “सखीची मला काहीच मदत होत नाही. ती वेगळ्या पिढीमधील आहे. जेव्हा मी तिला म्हणते मला कळत नाही काय घालावं तेव्हा ती म्हणते तुला कळणार तू जे घालशील ते तुला छानच दिसणार. सजताना मी तिला जास्त मदत करते.”
दरम्यान, शुभांगी गोखलेंची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका ‘ये है मोहेब्बतें’चा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे.