बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. काही महिलांना प्रसूतीनंतर पोस्टपॉर्टम डिप्रेशनचाही सामना करावा लागतो. एका टीव्ही अभिनेत्रीलाही याचा सामना करावा लागला, यासंदर्भात तिच्या मैत्रिणीने खुलासा केला आहे. या अभिनेत्रीने २०१२ मध्ये तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला होता. त्यानंतर पाच वर्षे ती पोस्टपॉर्टम डिप्रेशनमध्ये होती.
‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत सोमवारी मोठी घट; जाणून घ्या सलमानच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन
अभिनेत्री इला अरुण ‘बेबीज ब्लूज’ अनुषंगाने बोलत होत्या, हे प्रसूतीनंतरच्या नैराश्यावर म्हणजेच पोस्टपॉर्टम डिप्रेशनवर आधारित आहे. यावेळी त्यांची मैत्रीण व अभिनेत्री श्वेता कावत्राही अशाच नैराश्याच्या गर्तेत होती आणि ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती, असा धक्कादायक खुलासा इला यांनी केला आहे. इला अरुण म्हणाल्या, “आम्ही सात बहिणी आहोत आणि माझ्या आईने आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. जुन्या काळात बाळाच्या जन्मानंतर, महिलांना त्यांच्या माहेरी पाठवले जायचे, जेणेकरून त्यांना आधार मिळू शकेल. पण न्यूक्लियर फॅमिली असेल तर साथ देणारे कोणीच नाही. यामुळे डिप्रेशन येते.”
आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलच्या उत्तराने शाहरुख खान झालेला नि:शब्द
इला म्हणाल्या, “आमची एक अतिशय प्रिय मैत्रीण श्वेता कवात्रा आहे, तिने पाच वर्षांपर्यंत प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा सामना केला. ती आत्महत्या करण्यास तयार होती. आता तिने त्यावर मात केली आहे आणि ती तरुण मातांशी आपल्या आयुष्यातील अनुभव शेअर करू शकते, विचार शेअर करू शकते. आई होणे हे देवाचे वरदान आहे. पण हार्मोनल, सामाजिक आणि भावनिक बदलांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो हे दुर्दैव आहे.”
इला अरुण यांच्या आधी श्वेता कवात्रानेही तिच्या प्रसूतीनंतरच्या नैराश्याबद्दल सांगितलं होतं. “मला कळायचं नाही की मला नक्की काय होतंय. मला पॅनीक अटॅक येऊ लागले होते. मला विनाकारण राग यायचा. मला असहाय्य वाटायचे, माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले होते, इतकी निराशाजनक परिस्थिती होती,” असं ती म्हणाली होती. श्वेताने आतापर्यंत ‘कहानी घर-घर की’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘कुमकुम : एक प्यारा सा बंधन’ तसेच ‘कर ले तू भी मोहब्बत’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.