श्वेता तिवारी हिंदी टेलिव्हिजवरील लोकप्रिय कलाकार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधूम श्वेता घराघरांत पोहचली. या मालिकेत तिने साकारलेले प्रेरणा हे पात्र चांगलेच गाजले. सोशल मीडियावर श्वेता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिच्या एका नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने आपल्या इन्सटाग्रामवर गोव्यातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर एक मुलगा दिसून येत आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता वरुण कस्तूरिया आहे. श्वेताने हा फोटो शेअर करत लिहिले “सूर्यास्त आणि समुद्रकिनाऱ्याचा पाठलाग” श्वेताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले. “गेल्या २३ वर्षांपासून हिचे वय वाढतच नाहीये.” तर दुसऱ्याने “जावई आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. आणखी एकाने “संतुर वाली आई” अशी कमेंट केली आहे.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

कोण आहे वरुण कस्तुरीया?

वरुण कस्तुरीया हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहे. वरुण व श्वेताने ‘अपराजिता’ मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत श्वेताने वरुणच्या सासूची भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मात्र, एका वर्षातच ही मालिका बंद झाली. खऱ्या आयुष्यातही वरुण श्वेताला आईप्रमाणाचे मानतो.

हेही वाचा-

श्वेता तिवारीचे वैवाहिक जीवन

श्वेता तिवारीने १९९८ मध्ये राजा चौधरीबरोबर लग्नगाठ बांधली होती. २००० साली त्यांची मुलगी पलकचा जन्म झाला. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षानंतर म्हणजे २००७ साली श्वेता व राजा विभक्त झाले. श्वेताने राजा चौधरीवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये अभिनेत्रीने अभिनव कोहलीबरोबर लग्न केले. श्वेता आणि अभिनव यांना रेयांश नावाचा मुलगा आहे. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर श्वेता दुसऱ्या पतीपासूनही वेगळी झाली. श्वेताने अभिनववर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. सध्या श्वेता तिच्या दोन्ही मुलांना सिंगल मदर म्हणून वाढवत आहे.